वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिन साजरा
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी महाविद्यालयातील वूमन काउंसलिंग सेलच्या वतीने राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. सत्यभामा जाधव यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय कुलकर्णी उपस्थित होते. या ऑनलाईन व्याख्यानमालेचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख व वूमन्स कौन्सिलिंग सेलच्या समन्वयक डॉ.संजीवनी नेरकर यांनी केले. प्रमुख वक्त्या डॉ.सत्यभामा जाधव यांनी 'राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राची वर्तमानात प्रस्तुतता' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. यांनी आपल्या व्याख्यानातून, राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे भारतीय स्त्रीने जगासमोर प्रस्थापित केलेला एक उत्तुंग आदर्श आहेत तसेच स्वामी विवेकानंद म्हणजे जगातील युवकांसाठी एक चिरंतन आदर्श आहेत, असे प्रतिपादित केले. प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून युवकांनी महापुरुषांचे विचार कृतीत उतरवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ.पुष्पा गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भिमराव माळगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
View the embedded image gallery online at:
https://dhundamaharajdeglurkarcollege.in/index.php/2022-01-15-06-47-43.html#sigFreeId8e8007d30f