वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कालिदास दिनानिमित्त अतिथी व्याख्यान संपन्न
देगलूर (प्रतिनिधी) :
वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात कवी कुलगुरू कालिदास व गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील संस्कृत आणि हिंदी विभाग व ग्लोबल संस्कृत फोरम, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन अतिथी व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृत विभाग तर्फे डॉ. अंशुल दुबे, (असिस्टंट प्रोफेसर, तिलक महाविद्यालय औरैया, उत्तर प्रदेश) तर हिंदी विभागातर्फे डॉ. विशाल विक्रम सिंह, (राजस्थान विश्वविद्यालय जयपुर) यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. व्याख्यान सत्रामध्ये डॉ. अंशुल दुबे यांनी कालिदास आणि मेघदूत या विषयावर अत्यंत सुंदर आणि समर्पक प्रस्तुतीकरण करून आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. डॉ. विशाल विक्रम सिंह यांनी मोहन राकेश लिखीत आषाढ का एक दिन या नाट्य कथेचे उत्कृष्टपणे विस्तृत विवेचन केले.
या अतिथी व्याख्यान सत्रामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके, ग्लोबल संस्कृत फोरमचे अध्यक्ष आचार्य राजेश मिश्रा यांची तसेच सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती . या कार्यक्रमांमध्ये संस्कृत अभ्यास मंडळाची स्थापना करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सचित्र मेघदूत या चित्र पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सौ . कुलकर्णी तेजस्विनी व डॉ. सौ. गायकवाड पुष्पा यांनी करून दिला. उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके यांनी अध्यक्षीय समारोपातून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. संजीवनी नेरकर यांनी केले तर आभार डॉ. अभिमन्यू पाटील यांनी मानले.